Skip to content
-
Subscribe to our newsletter & never miss our best posts. Subscribe Now!
Pcb Today
Pcb Today
Close

Search

  • https://www.facebook.com/
  • https://twitter.com/
  • https://t.me/
  • https://www.instagram.com/
  • https://youtube.com/
Subscribe
Pune

शिवाजीराव आढळराव पाटील यांंनी हातपाय तोडण्याची धमकी

By
July 21, 2022 1 Min Read
Comments Off on शिवाजीराव आढळराव पाटील यांंनी हातपाय तोडण्याची धमकी

पुणे, दि. २१ (पीसीबी) : शिरूर लोकसभा मतदार संघाचे माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी शिंदे गटात सहभागी झाल्यानंतर शिवसेनेच्या स्थानिक कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांनी त्यांचा निषेध व्यक्त करत आंदोलन केले होते. तसेच काही कार्यकर्त्यानी त्यांना घरी जाऊन शिवीगाळ करत हात पाय तोडण्याची धमकी दिली. या प्रकरणी खेड पोलिसात १७ जणांहून अधिक जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

गणेश सांडभोर, राम गावडे, महेंद्र घोलप, अमोल विटकर, सचिन पडवळ, निलेश वाघमारे, कुमार ताजणे,गोरक्ष सुखाळे, सुरेश चव्हण शंकर दाते, नवनाथ कोतवाल, काका कुलकर्णी, दत्ता भांबुरे, तुषार सांडभोर, बबनराव दौंडकर, चंद्रकांत भोर, बाजीराव बुचडे (सर्व रा. राजगुरुनगर, ता. खेड) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत आंबेगाव तालुक्याचे शिवसेना विभाग प्रमुख अंकुश शेवाळे यांनी फिर्याद दिली आहे.

खेड येथील पुणे नाशिक महामार्गावर शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी त्यांच्या पुतळ्याला चपलांचा हार घालत जोडे मारले होते. त्यांची बदनामी करण्याचा प्रयत्न करून लोकांना अडवून ठेवले, त्यानंतर निषेध व्यक्त करत कार्यकर्ते हे आढळराव यांच्या घरी जात त्यांना हात पाय तोडू अशी धमकी दिली होती. त्यावरून हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी अधिक तपास खेड पोलीस करत आहे.

Author

Follow Me
Other Articles
Previous

आजारी खासदार गजानन किर्तीकर यांची मुख्यमंत्र्यांकडून घरी जाऊन विचारपूस

Next

भाजपा कार्यकर्ते आढळराव यांना भेटले

//

We influence 20 million users and is the number one business and technology news network on the planet

Sign Up for Our Newsletter

Subscribe to our newsletter to get our newest articles instantly!

[mc4wp_form id=”847″]

Copyright 2026 — Pcb Today. All rights reserved. Blogsy WordPress Theme