Skip to content
-
Subscribe to our newsletter & never miss our best posts. Subscribe Now!
Pcb Today
Pcb Today
Close

Search

  • https://www.facebook.com/
  • https://twitter.com/
  • https://t.me/
  • https://www.instagram.com/
  • https://youtube.com/
Subscribe
Pimpri

पीओपीच्या गणेश मूर्तीचे उत्पादन केल्यास स्टॉलला परवानगी नाही

By
July 26, 2022 2 Min Read
Comments Off on पीओपीच्या गणेश मूर्तीचे उत्पादन केल्यास स्टॉलला परवानगी नाही

पिंपरी, दि. २६ (पीसीबी) -महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण महामंडळाने प्लॅस्टर ऑफ पॅरिसच्या (पीओपी) गणेशमूर्तीवर बंदी घातली आहे. त्यामुळे पिंपरी-चिंचवड परिसरात कोणीही पीओपी मूर्तीचे उत्पादन करू नये, असे आवाहन महापालिकेच्या वतीने यापूर्वीच केले आहे. त्यामुळे या निर्णयाची कडक अंमलबजावणी करण्यात येणार आहे. त्यानंतरही कोणी पीओपीच्या गणेश मूर्तीचे उत्पादन केल्यास स्टॉलला परवानगी देणार नाही. तसेच क्षेत्रीय कार्यालयामार्फत कारवाई करण्यात येणार असल्याचे महापालिकेच्या वतीने स्पष्ट करण्यात आले आहे.

पीओपीच्या मूर्तीसाठी केमिकलयुक्त रंग वापरण्यात येतो. यामुळे मोठ्या प्रमाणात जलप्रदूषण होते. हा धोका ओळखून पीओपीच्या सर्व प्रकारच्या मूर्तीवर बंदी घातली आहे. मात्र, पीओपीची मूर्ती पर्यावरणाला घातक, वजनाने हलकी, दर कमी व कमी कालावधीत अधिक मूर्ती तयार होतात. त्यामुळे बहुतांश कारागीर अशा मूर्तीना प्राधान्य देतात. मातीकाम करणारा कारागीर दिवसाला एक ते दोन मूर्ती बनवतो. पीओपीचे काम करणारा कारागीर दिवसाला 20 ते 30 मूर्ती बनवतो. शाडू मातीची एक फुटाची मूर्ती 100 ते 1200 रुपयांना विकली जाते. या मूर्तीमुळे कुठल्याही प्रकारचे प्रदूषण होत नाही. मात्र, पीओपीची एक फुटाची मूर्ती 400 ते 1000 रुपयांना मिळते. त्यामुळे अनेक जण पीओपीची मूर्ती घेण्यास प्राधान्य देतात.

कोरोनाच्या दोन वर्षांच्या कालावधीनंतर यंदा गणेशोत्सव मोठ्या उत्साहात साजरा होण्याची शक्‍यता आहे. सप्टेंबर महिन्यात गणेशोत्सव साजरा केला जाणार आहे. शहरातील विविध गणेश मंडळे आणि घरोघरी गणेश मूर्तीची प्रतिष्ठापना केली जाते. शहरात अनेक ठिकाणी शाडूच्या मूर्ती मिळतात. मात्र, पीओपीच्या मूर्तीची विक्री करण्याचे प्रमाण सर्वाधिक होते. प्रदूषण नियंत्रण महामंडळाने दोन वर्षांपूर्वीच पीओपीच्या मूर्तीवर बंदी घातली आहे, पण करोनामुळे या निर्णयाची अंमलबजावणी झालेली नव्हती. यंदापासून याची कडक अंमलबजावणी केली जाणार आहे.

पीओपीच्या गणेशमूर्तीचे उत्पादन कोणी करू नये, यासाठी महापालिकेच्या वतीने यापूर्वीच आवाहन केले आहे. या निर्णयाची कडक अंमलबजावणी करण्यात येणार आहे. त्यानंतरही कोणी पीओपी मृर्त्यांचे उत्पादन केल्यास गणेश मूर्तीचे स्टॉल लावण्यास महापालिकेच्या वतीने परवानगी देण्यात येणार नाही, असे महापालिका पर्यावरण विभागाने सांगितले.

Author

Follow Me
Other Articles
Previous

टाटा मोटर्स कंपनीची २५९ कोटी रुपयांची वादग्रस्त नोटीस अखेर रद्द

Next

…अशीच मुलाखत एकनाथ शिंदेंचीही घ्यायला पाहिजे – दीपाली सय्यद

//

We influence 20 million users and is the number one business and technology news network on the planet

Sign Up for Our Newsletter

Subscribe to our newsletter to get our newest articles instantly!

[mc4wp_form id=”847″]

Copyright 2026 — Pcb Today. All rights reserved. Blogsy WordPress Theme