Skip to content
-
Subscribe to our newsletter & never miss our best posts. Subscribe Now!
Pcb Today
Pcb Today
Close

Search

  • https://www.facebook.com/
  • https://twitter.com/
  • https://t.me/
  • https://www.instagram.com/
  • https://youtube.com/
Subscribe
Pimpri

पाण्याची चिंता मिटली! पवना धरणात परिसरात पावसाचा जोर वाढला

By
July 13, 2022 1 Min Read
Comments Off on पाण्याची चिंता मिटली! पवना धरणात परिसरात पावसाचा जोर वाढला

पिंपरी, दि. १३ (पीसीबी) – पिंपरी-चिंचवडसह मावळवासीयांची तहान भागविणा-या पवना धरण परिसरात पावसाचा जोर वाढला आहे. गेल्या चोवीस तासात 149 मिली मीटर पावसाची नोंद झाली आहे. त्यामुळे धरणातील पाणीसाठा 5.69 टक्क्यांनी वाढला असून धरणात एकूण 42.18 टक्के पाणीसाठा आहे. त्यामुळे पाण्याची चिंता मिटली आहे.

पिंपरी-चिंचवडसह मावळ भागातील विविध गावांचा पाण्याचा मुख्य स्रोत  पवना धरण आहे. महापालिका सध्या धरणातून 510 एमएलडी पाणी उचलते. शहराला पाणीपुरवठा करण्यासाठी पवना नदीवरील रावेत – पुनावळे दरम्यान असलेल्या बंधा-यातून अशुद्ध जलउपसा करण्यात येतो. सेक्टर 23 निगडी येथे पाणी शुद्ध करुन शहरवासीयांना पुरवठा केला जातो.

पवना धरणातील परिस्थिती!
# गेल्या 24 तासात झालेला पाऊस = 149 मि.मि.*

# 1 जूनपासून झालेला पाऊस = 1 हजार 52 मि.मि.*

# गेल्या वर्षी आजच्या तारखे पर्यंत झालेला एकूण पाऊस = 625 मि.मि.*

# धरणातील सध्याचा पाणीसाठा = 42.18 टक्के*

# गेल्या वर्षी आजच्या तारखेचा धरणातील पाणीसाठा = 33.60 टक्के*

# गेल्या 24 तासात पाणीसाठ्यात झालेली वाढ
= 5.69 टक्के*

# 1 जूनपासून पाणीसाठ्यात झालेली वाढ = 25.34 टक्के*

Author

Follow Me
Other Articles
Previous

गुजरातमधील एटीएसच्या कारवाईत तब्बल 376 कोटी 50 लाख रुपये किंमतीचे 75.3 किलो हेरॉइन जप्त

Next

विवाहित महिलेवर बलात्कार; एकास अटक

//

We influence 20 million users and is the number one business and technology news network on the planet

Sign Up for Our Newsletter

Subscribe to our newsletter to get our newest articles instantly!

[mc4wp_form id=”847″]

Copyright 2026 — Pcb Today. All rights reserved. Blogsy WordPress Theme