Skip to content
-
Subscribe to our newsletter & never miss our best posts. Subscribe Now!
Pcb Today
Pcb Today
Close

Search

  • https://www.facebook.com/
  • https://twitter.com/
  • https://t.me/
  • https://www.instagram.com/
  • https://youtube.com/
Subscribe
Maharashtra

नीरव मोदीची २५३.६२ कोटींची मालमत्ता जप्त

By
July 23, 2022 1 Min Read
Comments Off on नीरव मोदीची २५३.६२ कोटींची मालमत्ता जप्त

मुंबई, दि. २३ (पीसीबी) : सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) नीरव मोदी समूह कंपन्यांच्या २५३ कोटी ६२ लाख रुपये किमतीची हाँगकाँगमधील मालमत्ता जप्त केली. त्यात रत्ने, दागिने आणि बँक ठेवींचा समावेश असल्याची माहिती ईडीने शुक्रवारी दिली. या प्रकरणातील एकूण जप्त केलेल्या मालमत्तेची किंमत २ हजार ६५० कोटी ७ लाख रुपये आहे.

मोदी सध्या ब्रिटनच्या तुरुंगात असून त्याने पंजाब नॅशनल बँकेची दोन अब्ज डॉलरची (सुमारे ६ हजार ४९८.२० कोटी रुपये) फसवणूक केल्याचा आरोप असून तो या प्रकरणात मुख्य आरोपी आहे. केंद्रीय अन्वेषण विभाग (सीबीआय) या प्रकरणी चौकशी करत आहे. ईडीच्या म्हणण्यानुसार, ६ हजार ४९८.२० कोटी रुपयांच्या पीएनबी बँकेच्या फसवणूक प्रकरणात गैरव्यवहार प्रतिबंधक कायदा, २००२ (पीएमएलए) अंतर्गत सक्तवसुली प्रकरण माहिती अहवाल नोंदवून तपास सुरू केला होता.

नीरव मोदी समूहाच्या हाँगकाँगमधील कंपन्यांच्या काही मालमत्ता या हिरे, दागिने आणि खात्यांमधील ठेवींच्या रूपात होत्या. त्या मालमत्ता आर्थिक गैरव्यवहार प्रतिबंधक कायदा, २००२ (पीएमएलए) कलमांतर्गत तात्पुरत्या जोडल्या गेल्या आहेत, असे ईडीकडून सांगण्यात आले.

Author

Follow Me
Other Articles
Previous

रावेत प्रभाग सर्वांधिक मतदारांचा तर बापुजीबुवानगर प्रभागात सर्वात कमी मतदार

Next

अजित पवार यांच्या वाढदिवसानिमित्त अनाथ आश्रम येथील ज्येष्ठ नागरिकांना 160 ड्रेस वाटप – युनूस पठाण

//

We influence 20 million users and is the number one business and technology news network on the planet

Sign Up for Our Newsletter

Subscribe to our newsletter to get our newest articles instantly!

[mc4wp_form id=”847″]

Copyright 2026 — Pcb Today. All rights reserved. Blogsy WordPress Theme