Skip to content
-
Subscribe to our newsletter & never miss our best posts. Subscribe Now!
Pcb Today
Pcb Today
Close

Search

  • https://www.facebook.com/
  • https://twitter.com/
  • https://t.me/
  • https://www.instagram.com/
  • https://youtube.com/
Subscribe
Desh

डोलो-६५० गोळ्यांच्या विक्रीसाठी डॉक्टरांना हजार कोटींचे गिफ्ट

By
July 14, 2022 2 Min Read
Comments Off on डोलो-६५० गोळ्यांच्या विक्रीसाठी डॉक्टरांना हजार कोटींचे गिफ्ट

नवी दिल्ली, दि. १४ (पीसीबी) – कोरोना काळात मोठ्या प्रमाणात चर्चेत राहिलेल्या डोलो-६५० गोळ्यांच्या विक्रीसाठी निर्मात्यांनी अनैतिक पद्धतीचा अवलंब केल्याचा आरोप केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाने (सीबीडीटी) केला आहे. इतकंच नाही तर गोळ्यांची प्रसिद्धी करण्यासाठी डॉक्टर आणि वैद्यकीय व्यावसायिकांना जवळपास हजार कोटींचं गिफ्ट देण्यात आल्याचाही आरोप केला आहे. प्राप्तिकर विभागाने ६ जुलैला बंगळुरुमधील स्थित मायक्रो लॅब्स लिमिटेडशी संबंधित नऊ राज्यांमधील ३६ ठिकाणी छापे टाकल्यानंतर हा दावा केला आहे.

औषध निर्मात्यांवर कारवाई करण्यात आल्यानंतर केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाने एकूण १ कोटी २० लाखांची रोख रक्कम जप्त केली असल्याची माहिती दिली आहे. तसंच १ कोटी ४० लाखांचे सोन्याचे दागिनेही जप्त करण्यात आले आहेत. याप्रकरणी मायक्रो लॅब्स लिमिटेडने अद्याप कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही.तपासादरम्यान कागदपत्रं आणि डिजिटल डेटाच्या रूपात अनेक भक्कम पुरावे सापडले असून ते जप्त करण्यात आल्याचं सांगण्यात आलं आहे. पुराव्यांची छाननी करण्यात आली असता वैद्यकीय व्यावासायिकांना विक्री आणि बढतीच्या नावाखाली गिफ्ट देण्यात आल्याचा उल्लेख आहे.

केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाच्या माहितीनुसार, डॉक्टर तसंच वैद्यकीय व्यावसायिकांना प्रचार, सेमिनार, वैद्यकीय सल्ला अशा शीर्षकांखाली आपल्या कंपनीच्या उत्पादनांची प्रसिद्धी करण्यासाठी प्रवास खर्च, भेटवस्तू दिल्या जात होत्या.
पुराव्यांवरुन ग्रुपने आपली उत्पादनं आणि ब्रँडची प्रसिद्धी करण्यासाठी अनैतिक पद्धतीचा अवलंब केल्याचं उघड झालं आहे. मोफत देण्यात आलेल्या या गोष्टींची किंमत जवळपास १ हजार कोटी आहे. केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाच्या निवदेनात या ग्रुपचा उल्लेख नसला तरी सूत्रांच्या माहितीनुसार, हे मायक्रो लॅब्स लिमिटेडेशी संबंधित आहे.

करोना काळात डॉक्टरांकडून आणि मेडिकलमध्ये ताप आणि वेदना कमी होण्यासाठी डोलो-६५० गोळी घेण्याचा सल्ला दिला जात होता. कंपनीच्या बेवसाईटवर फेब्रुवारी महिन्यात प्रसिद्ध झालेल्या लेखानुसार, कंपनीने २०२० मध्ये ३५० कोटी टॅब्लेट्सची (डोलो-६५०) विक्री केली. यामधून कंपनीने वर्षभरात ४०० कोटींचा मिळवला होता. कंपनीचे सीएमडी दिलीप सुराना यांनी ही माहिती दिल्याचा लेखात उल्लेख आहे.

Author

Follow Me
Other Articles
Previous

शिंदे सरकारचा मोठा निर्णय, पेट्रोल-डिझेलची करकपात

Next

शिवसेनेला रोज नवा धक्का, मीरा भाईंदरचे १८ नगरसेवक शिंदे गटात

//

We influence 20 million users and is the number one business and technology news network on the planet

Sign Up for Our Newsletter

Subscribe to our newsletter to get our newest articles instantly!

[mc4wp_form id=”847″]

Copyright 2026 — Pcb Today. All rights reserved. Blogsy WordPress Theme