Skip to content
-
Subscribe to our newsletter & never miss our best posts. Subscribe Now!
Pcb Today
Pcb Today
Close

Search

  • https://www.facebook.com/
  • https://twitter.com/
  • https://t.me/
  • https://www.instagram.com/
  • https://youtube.com/
Subscribe
Pimpri

खाद्य निगम विभागात नोकरी लावण्याच्या बहाण्याने 19 लाखांची फसवणूक

By
July 18, 2022 1 Min Read
Comments Off on खाद्य निगम विभागात नोकरी लावण्याच्या बहाण्याने 19 लाखांची फसवणूक

रावेत, दि. १८ (पीसीबी) – खाद्य निगम विभागात नोकरी लावण्याचे आमिष दाखवून दोघांकडून 18 लाख 97 हजार रुपये घेतले. पैसे घेऊन नोकरी न लावता फसवणूक केली. हा प्रकार जुलै 2021 ते नोव्हेंबर 2021 या कालावधीत रावेत येथे घडला.

विनोद शंकर पवार (वय 33), सागर शंकर पवार (वय 25), सुयोग किशोर चव्हाण (वय 27, तिघे रा. काळेवाडी), दीपेश शर्मा, राकेश मिश्रा यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी महिलेने रविवारी (दि. 17) रावेत पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींनी फिर्यादी यांच्या मुलाला आणि त्याच्या मित्राला खाद्य निगम विभागात नोकरी लावतो असे आमिष दाखवले. नोकरी लावण्यासाठी टप्प्याटप्प्यात आरोपींनी 18 लाख 97 हजार रुपये घेतले. खोटे जॉइनिंग लेटर देऊन दोघांची फसवणूक केली. पोलिसांनी विनोद पवार, सागर पवार, सुयोग चव्हाण या तिघांना अटक केली आहे. रावेत पोलीस तपास करीत आहेत.

Author

Follow Me
Other Articles
Previous

शहरातील रस्त्यांवर खड्डेच-खड्डे, प्रशासन म्हणतेय खड्ड्यांची आकडेवारी नाही!

Next

गुंतवणुकीच्या बहाण्याने 58 लाख रुपयांची फसवणूक

//

We influence 20 million users and is the number one business and technology news network on the planet

Sign Up for Our Newsletter

Subscribe to our newsletter to get our newest articles instantly!

[mc4wp_form id=”847″]

Copyright 2026 — Pcb Today. All rights reserved. Blogsy WordPress Theme