Skip to content
-
Subscribe to our newsletter & never miss our best posts. Subscribe Now!
Pcb Today
Pcb Today
Close

Search

  • https://www.facebook.com/
  • https://twitter.com/
  • https://t.me/
  • https://www.instagram.com/
  • https://youtube.com/
Subscribe
Pune

केतकी माटेगावकरच्या चुलत भावाची आत्महत्या…

By
July 16, 2022 1 Min Read
Comments Off on केतकी माटेगावकरच्या चुलत भावाची आत्महत्या…

पुणे, दि. १६ (पीसीबी) : सिने अभिनेत्री आणि गायिका केतकी माटेगावकरच्या चुलत भावाने केली आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. अक्षय अमोल माटेगावकर असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे. नोकरी न मिळण्याच्या भीतीने इमारतीच्या आठव्या मजल्यावरून उडी मारत आत्महत्या केल्याचे अक्षयने आत्महत्येपूर्वी लिहिलेल्या चिट्ठीत त्याने नमूद केले आहे. या घटनेनंतर सुसगाव परिसरात खळबळ उडाली आहे.

अक्षय सिम्बॉयसिस महाविद्यालयात कॉम्प्युटर सायन्स विभागाच्या चौथ्या वर्षात शिकत होता. त्याने एका आयटी कंपनीत इंटर्नशिप केली होती. त्यानंतर काही कंपन्यांमध्ये नोकरीसाठी त्याने अर्जही केले होते. मात्र त्याला नोकरी मिळत नव्हती. या भीतीमुळे त्याने आत्महत्या केली असा उल्लेख त्याने आत्महत्येपूर्वी लिहून ठेवलेल्या चिठ्ठीत नमूद केले आहे. अक्षयची आई मीनल माटेगावकर या मुंबईत प्राध्यापिका म्हणून कार्यरत आहेत, वडील अमोल माटेगावकर हे नामांकित कंपनीत काम करतात. या घटनेनंतर माटेगावकर कुंटुंबियांना मोठा धक्का बसला आहे. हिंजवडी पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत.

Author

Follow Me
Other Articles
Previous

एक दुजे के लिए प्रमाणे शिंदे – फडणवीस सरकारचा राजकीय अंत लवकरच

Next

स्पाईन रोड बाधित कुटुंबांना पर्यायी भूखंड वाटप..

//

We influence 20 million users and is the number one business and technology news network on the planet

Sign Up for Our Newsletter

Subscribe to our newsletter to get our newest articles instantly!

[mc4wp_form id=”847″]

Copyright 2026 — Pcb Today. All rights reserved. Blogsy WordPress Theme