Skip to content
-
Subscribe to our newsletter & never miss our best posts. Subscribe Now!
Pcb Today
Pcb Today
Close

Search

  • https://www.facebook.com/
  • https://twitter.com/
  • https://t.me/
  • https://www.instagram.com/
  • https://youtube.com/
Subscribe
Pimpri

आता सायबर सेलची २४ तास सेवा उपलब्ध

By
July 14, 2022 1 Min Read
Comments Off on आता सायबर सेलची २४ तास सेवा उपलब्ध

पिंपरी, दि. १४ (पीसीबी) :- सायबर गुन्ह्यांची संख्या वाढल्यामुळे नागरिकांना तत्काळ प्रतिसाद मिळावा यासाठी आता सायबर सेलची २४ तास सेवा उपलब्ध राहणार आहे. याबाबत पोलिस आयुक्त अंकुश शिंदे यांनी संबंधित विभागाला सूचना दिल्या आहेत.

मोबाईल व ऑनलाईन बँकिंगच्या वाढत्या वापरामुळे सायबर क्राईमचा वाढू लागला आहे. मागील सहा महिन्यात पिंपरी चिंचवड सायबर सेलकडे सुमारे साडे तीन हजार तक्रारी आल्या आहेत. यातील अनेक प्रकरणात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. अलीकडे काही वर्षात कॅशलेस व्यवहारात वाढ झाली आहे. कोणतीही खात्री न करता मोबाईल अॅप डाऊनलोड केले जात आहेत. महिलांचे बनावट प्रोफाईल तयार करणे, अश्लील फोटो वेबसाईट्सवर टाकणे या गुन्ह्यांचा छडा लावणे हे देखील पोलिसांसमोरचे मोठे आव्हान आहे.

सायबर गुन्ह्यांची तपासणी करण्यासाठी आलेल्या नागरिकांना तत्काळ प्रतिसाद मिळणे अपेक्षित आहे. त्यासाठी सायबर सेल अंतर्गत नवीन डेस्क सुरू करण्यात येत आहे. यामध्ये २४ तास अधिकारी व कर्मचारी कार्यरत राहून नागरिकांचे समाधान करतील, असे पोलिस आयुक्त अंकुश शिंदे यांनी सांगितले.

Author

Follow Me
Other Articles
Previous

द्रौपदी मुर्मू यांच्या उमेदवारीला विरोध करणे अजिबात योग्य नाही

Next

स्वर्गीय प्रियांका घोलप हिला न्याय मिळण्यासाठी निगडीतील संतप्त महिलांचा खेड न्यायालयात प्रचंड आक्रोश

//

We influence 20 million users and is the number one business and technology news network on the planet

Sign Up for Our Newsletter

Subscribe to our newsletter to get our newest articles instantly!

[mc4wp_form id=”847″]

Copyright 2026 — Pcb Today. All rights reserved. Blogsy WordPress Theme