Skip to content
-
Subscribe to our newsletter & never miss our best posts. Subscribe Now!
Pcb Today
Pcb Today
Close

Search

  • https://www.facebook.com/
  • https://twitter.com/
  • https://t.me/
  • https://www.instagram.com/
  • https://youtube.com/
Subscribe
Pimpri

आता महापालिकेचे सर्व विभाग ‘ट्विटर’वर!

By
July 27, 2022 3 Min Read
Comments Off on आता महापालिकेचे सर्व विभाग ‘ट्विटर’वर!

पिंपरी दि. २७ (पीसीबी)  – पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने विविध सेवा सुविधा उपलब्ध करुन देताना नागरी सहभाग देखील या प्रक्रीयेमध्ये असावा याकरीता महापालिका विविध संवाद माध्यमांचा प्रभावी वापर प्रशासकीय कामकाजात करीत आहे.  जलदगतीने माहितीचा प्रसार आणि नागरी संवाद साधण्यासाठी आता महापालिकेचे सर्व विभाग ई-मेल बरोबरच ट्विटरचा वापर देखील करणार आहेत. नागरिकांसमवेत सोहार्दपूर्ण नाते निर्माण करण्यासाठी ट्विटर सारखे जलद द्विसंवादी माध्यम प्रभावी ठरणार असून महापालिकेची सकारात्मक प्रतिमा उंचाविण्यासाठी ट्विटर उपयुक्त ठरेल.  नागरिकांनी या माध्यमातून प्रशासनाशी संवाद साधावा असे आवाहन आयुक्त तथा प्रशासक राजेश पाटील यांनी केले.  

पिंपरी येथील मुख्य प्रशासकीय इमारतीमधील दिवंगत मधुकरराव पवळे सभागृहात सर्व विभागप्रमुखांना ट्विटर वापरा विषयी संगणकीय सादरीकरणाद्वारे माहिती देण्यात आली.  यावेळी अतिरिक्त आयुक्त विकास ढाकणे, जितेंद्र वाघ, उल्हास जगताप, नगररचना उपसंचालक प्रसाद गायकवाड, आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. अनिल रॉय, शहर अभियंता मकरंद निकम, मुख्य लेखा व वित्त अधिकारी जितेंद्र कोळंबे, मुख्यलेखापरिक्षक प्रमोद भोसले, सह शहर अभियंता रामदास तांबे, श्रीकांत सवणे, सतिश इंगळे, संजय खाबडे, ज्ञानदेव जुंधारे, वायसीएम रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. राजेंद्र वाबळे, सहाय्यक आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. लक्ष्मण गोफणे, मुख्य माहिती व तंत्रज्ञान अधिकारी निळकंठ पोमण, आयटीआयचे प्राचार्य शशिकांत पाटील, उप आयुक्त अजय चारठाणकर, रविकिरण घोडके यांच्यासह विविध विभागांचे प्रमुख  उपस्थित होते.

आयुक्त  राजेश पाटील म्हणाले, लोकांसमवेत संवाद साधण्यासाठी प्रशासकीय कामकाजामध्ये विविध माध्यमांचा वापर होणे आवश्यक आहे.  महापालिकेच्या योजना, सुविधा, उपक्रम आदी बाबी नागरिकांपर्यंत पोहोचविण्यासाठी ट्विटर सारखे माध्यम वापरात आणले पाहिजे.  महापालिकेचे तसेच महापालिका आयुक्त म्हणून माझे स्वत:चे ट्विटर अकाऊंट आहे.  आता जागतिक पातळीवर या माध्यमाचा वापर वाढत आहे.  हे संवेदनशील माध्यम असून वापरण्यास सुलभ आहे.  महापालिकेने  नागरिकांकरीता व्हॉटस् अॅप – चॅट बॉट प्रणालीचा वापर सुरु केला आहे.  

या प्रणालीवर दैनंदिन १०० पेक्षा अधिक व्यक्ती संवाद साधून आपल्या सूचना, तक्रारी आणि म्हणणे मांडतात.  यामुळे प्रशासन गतीमान होण्यास मदत होत आहे.  आता महापालिकेच्या सर्व विभागांचे स्वतंत्र ट्विटर अकाऊंट असणार आहे.  त्यामुळे त्या विभागातील नागरिकांशी संबंधित बाबी ट्विट करुन नागरिकांना त्याबद्दल अवगत केले जाणार आहे.  नागरिकांना या माध्यमातून प्रतिसाद देणारे प्रशासन म्हणून महापालिकेची ओळख होणार आहे.  या माध्यमाचा उपयोग विभागप्रमुखांनी केल्यास नागरिकांच्या अडचणी, शंका यांचे निरसन जलद गतीने होऊन नागरिकांनी त्वरीत सेवा मिळू शकेल.  शिवाय महापालिकेच्या फॉलोअर्समध्ये देखील वाढ होणार आहे.  त्यामुळे सर्व विभागप्रमुखांनी व्यक्तिश: लक्ष घालून संवाद साधावा असे निर्देश आयुक्त पाटील यांनी अधिका-यांना दिले.  ट्विटर हे संवादाचे पुढचे पाऊल असून नागरिकांनी या उपक्रमाला प्रतिसाद द्यावा असे आवाहनही त्यांनी केले. 
मंगलमूर्तींच्या द्वारयात्रेला शुक्रवारपासून प्रारंभ
पिंपरी, दि. २७ (पीसीबी)
– श्रीमन् महासाधू श्री मोरया गोसावी संजीवन समाधी मंदिरातून निघणाऱ्या द्वारयात्रेस येत्या शुक्रवार (दि.29) पासून प्रारंभ होणार आहे.

सालाबादप्रमाणे श्रावण महिन्याच्या पहिल्या दिवसापासून म्हणजे श्रावण शु. प्रतिपदा ते चतुर्थी असे चार दिवस श्रीमन् महासाधू श्रीमोरया गोसावी महाराज यांची द्वारयात्रेची परंपरा आहे. या चार दिवसात चिंचवडगावच्या चारही दिशांच्या द्वाराला असलेल्या देवींच्या स्थानाला जाण्याची परंपरा आहे. द्वारयात्रेच्या काळात रोज सकाळी नऊ वाजता यात्रेसाठी श्री मंगलमूर्ती वाड्यातून चिंचवड देवस्थानचे ट्रस्टचे मुख्य विश्‍वस्त श्री देव महाराज यांच्या समवेत सुमारे 100 ते 150 भाविकांचा समुदाय वाजत-गाजत निघतो.

श्रीमन् महासाधू श्रीमोरया गोसावी महाराजांच्या संजीवन समाधीचे दर्शन घेऊन या यात्रेस प्रारंभ केला जातो. द्वाराच्या ठिकाणी पोहोचल्यावर द्वारदेवतेचे पूजन, श्रीमोरया गोसावींनी रचलेली पदे व गोंधळ, जोगवा म्हणणे इ. धार्मिक विधी केले जातात. व पुन्हा येऊन श्रीमन् महासाधू श्रीमोरया गोसावी संजीवन समाधी मंदिरातील श्रीचिंतामणी महाराज यांच्या समाधी समोर धुपारती होते, व मगच द्वरयात्रेची सांगता होते. यानंतर चिंचवड देवस्थान ट्रस्ट तर्फे महाप्रसादाचे वाटप केले जाते.

द्वारयात्रा पहिल्या दिवशी 29 जुलै रोजी पूर्व द्वार असलेल्या एम्पायर इस्टेट सोसायटी, चिंचवड स्टेशन येथील श्री मांजराई देवी मंदिर येथे जाणार असून यात्रेच्या दुसऱ्या दिवशी 30 जुलै रोजी दक्षिणद्वार असलेल्या वाकड येथील श्री आसराई देवी मंदिर, तिसऱ्या दिवशी 31 जुलै रोजी पश्चिमद्वार असलेल्या रावेत येथील श्री ओझराई देवी मंदिर आणि चौथ्या दिवशी 1 ऑगस्ट रोजी उत्तरद्वार असलेल्या आकुर्डी येथील श्री मुक्ताई देवी मंदिरात व श्री खंडोबा मंदिरात यात्रा दर्शनासाठी जाणार आहे, अशी माहिती चिंचवड देवस्थान ट्रस्टचे मुख्य विश्वस्त मंदार देव महाराज यांनी दिली. 

Author

Follow Me
Other Articles
Previous

महापालिका निवडणूक! ओबीसींसाठीच्या 37 राखीव जागांसाठी शुक्रवारी चिंचवडमध्ये आरक्षण सोडत

Next

सत्तेत असो किंवा नसो, त्यांना विदर्भात येताना नेहमीच उशीर होतो

//

We influence 20 million users and is the number one business and technology news network on the planet

Sign Up for Our Newsletter

Subscribe to our newsletter to get our newest articles instantly!

[mc4wp_form id=”847″]

Copyright 2026 — Pcb Today. All rights reserved. Blogsy WordPress Theme